दिनांक 18 June 2019 वेळ 6:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दादर-डहाणू लोकल फेरी पुर्ववत करा!

दादर-डहाणू लोकल फेरी पुर्ववत करा!

>> डहाणू वैतरणा संस्थेने राबवली स्वाक्षरी मोहिम

DADAR-DAHANUवार्ताहर/बोईसर, दि. 8 : एक नोव्हेंबरपासुन बंद करण्यात आलेली दादर ते डहाणू लोकल फेरी पुन्हा सुरु करण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने स्वाक्षरी मोहीम राबवून 900 प्रवाशांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन पश्चिम रेल्वेचे अधिकारी सुनील कुमार यांना दिले आहे.

मागील काही वर्षांपासुन दादरहून डहाणूसाठी सायंकाळी 4 वाजून 47 मिनिटांनी लोकल सोडण्यात येत होती. ही लोकल पावणे सहा वाजेपर्यंत विरार स्थानकात पोहोचत असल्याने विरार ते दादर दरम्यान प्रवास करणार्‍या वैतरणा ते डहाणू पट्ट्यातील हजारो प्रवाशांना ही लोकल फेरी सोयीची ठरत होती. मात्र एक नोव्हेंबरपासून ही लोकल सेवा बंद केल्यामुळे प्रवाशांना विशेष करुन ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना बलसाड पॅसेंजर किंवा फ्लाईंग राणी या गाड्यांवर अवलंबून राहावे लागत असुन लांब पल्ल्याच्या व पासधारक प्रवाशांनी भरलेल्या या गाड्यांमध्ये मोठ्या गर्दीचा सामना करत प्रवासा करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता दादर-डहाणू लोकल फेरी पूर्ववत व्हावी या मागणीसाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने प्रवासी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून 900 स्वाक्षर्‍यांचे निवेदन पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांना देऊन लवकरात लवकर ही गाडी सुरू व्हावी ही मागणी केली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top