दिनांक 18 June 2019 वेळ 6:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » करंदीकर महाविद्यालयात पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट व वारली चित्रकला अभ्यासक्रम उपलब्ध

करंदीकर महाविद्यालयात पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट व वारली चित्रकला अभ्यासक्रम उपलब्ध

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: येथील सौ. सीताबाई करंदीकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट ॲन्ड इंटरव्ह्यूव स्किल्स’ आणि मराठी विभागातर्फे ‘वारली चित्रकला’ हे दोन व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीचे कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगारभिमूख करणे हा ‘पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट ॲन्ड इंटरव्ह्यूव स्किल्स’ या अभ्यासक्रमाचा उद्देश असून ४० तासांच्या या अभ्यासक्रमासाठी २५० रुपये शुल्क आहे. तर चित्रकला गुण विकसित करुन त्यातून रोजगार निर्मिती साधण्यासाठी सुरु करण्यात आलेला ‘वारली चित्रकला’ अभ्यासक्रम २ महिन्यांचा आहे व त्यासाठी नाममात्र ५० रुपये शुल्क आहे. या अभ्यासक्रमांसाठी किमान पात्रता १२ वी पास असून जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अभ्यासक्रमांचे समन्वयक प्रा. ए. बी. जाधव व प्रा. डॉ. अंजली मस्कॅरेन्हस यांनी केले असून इच्छूकांनी मोबाईल क्रमांक 8007824034 अथवा ७७५७८४६०१६ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top