दिनांक 21 January 2019 वेळ 5:44 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू व तलासरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बंद

डहाणू व तलासरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बंद

डहाणू दि. ८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय आणि सीटू-संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज बंद चे आवाहन केले होते. त्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. डहाणू शहरातील बाजारपेठ व कारखाने देखील बंद करण्यात आले होते. त्याशिवाय मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटी येथे रास्तारोको करण्यात आला. दोन्ही बाजूंच्या वाहिन्यांवर वाहनांची दूरदूरपर्यंत कोंडी झाली होती. यावेळी झालेल्या जाहीर सभेस डॉ. अशोक ढवळे, एल. बी. धनगर, बारक्या मांगात, एडवर्ड वरठा, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, विनोद निकोले, चंद्रकात घोरखना, रामदास सुतार, लहानी दौडा, प्राची हातिवलेकर, स्वाती मेश्राम यांनी संबोधित केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वाना अटक व सुटका केली.

Rajtantra Media/डहाणू दि. ८ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय आणि सीटू-संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी आज बंद चे आवाहन केले होते. त्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. डहाणू शहरातील बाजारपेठ व कारखाने देखील बंद करण्यात आले होते. त्याशिवाय मुंबई अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटी येथे रास्तारोको करण्यात आला. दोन्ही बाजूंच्या वाहिन्यांवर वाहनांची दूरदूरपर्यंत कोंडी झाली होती. यावेळी झालेल्या जाहीर सभेस डॉ. अशोक ढवळे, एल. बी. धनगर, बारक्या मांगात, एडवर्ड वरठा, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, विनोद निकोले, चंद्रकात घोरखना, रामदास सुतार, लहानी दौडा, प्राची हातिवलेकर, स्वाती मेश्राम यांनी संबोधित केले. त्यानंतर पोलिसांनी सर्वाना अटक व सुटका केली.

आजच्या मागण्यांपैकी वाहनांची आरटीओ पासिंग डहाणू किंवा तलासरी येथे सुरु करावी ही स्थानिक मागणी होती. सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना विरार येथे तर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कल्याण येथे पासिंगसाठी जावे लागते.

  • उद्या (९ जानेवारी) डहाणू बंद नाही
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. तथापि हा बंद काही राज्यांत ८ जानेवारी रोजी तर काही राज्यात ९ जानेवारी रोजी पाळण्यात येणार असून डहाणू तालुक्यात आज बंद पाळण्यात आल्याने उद्या बंद नाही. याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून खातरजमा करण्यात आली असून उद्या व्यवहार सुरळीत रहातील.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top