दिनांक 22 March 2019 वेळ 1:58 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोरला इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके, 57 मतदान केंद्रात 4 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान मतदारांना दाखवली जाणार प्रात्यक्षिके

मनोरला इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके, 57 मतदान केंद्रात 4 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान मतदारांना दाखवली जाणार प्रात्यक्षिके

MANOR EVM VVPATप्रतिनिधी
मनोर, दि. 7 : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात इव्हीएममशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मनोर मंडळ क्षेत्रात सोमवारी (दि.07) मनोर टाकवाहाल, सवरखंड, कोसबाड, करळगाव आणि टेन या गावातील मतदारांना इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या जनजागृती कार्यक्रमात मतदारांनी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गर्दी केली होती. मनोर मंडळ क्षेत्रातील 57 मतदान केंद्रात 4 जानेवारी ते 16 जानेवारी या काळात मतदारांना प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन पालघरचे उपविभागीय अधिकारी विकास गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे.

मनोर ग्रामपंचायत हद्दीत रिक्षाला लाऊड स्पीकर लावून मतदारांना जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रात्यक्षिकावेळी मनोरच्या सरपंच पौर्णिमा दातेला, उपसरपंच कैफ रईस, मंडळ अधिकारी वसंत बारवे, तलाठी नितीन सुर्वे, दीपक पिंपळे, संदीप सोनावणे, मनोर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top