दिनांक 18 June 2019 वेळ 7:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

LOGO-4-Online
प्रतिनिधी
मनोर, दि. 7 : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वसई तालुक्यातील सायवण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे सायकल वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 9) सायवणला आयोजित करण्यात आला आहे.

ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत पोहोचण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरून प्रवास करावा लागतो त्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायवन जिल्हा परिषद शाळेत इ-लर्निंग लॅबचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आमदार हितेंद्र ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव आणि अस्टार्क ग्रुपचे किशोर मुसळे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्टच्या सीएसआर विभागाचे धनंजय सणस यांनी दिली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!

comments

About Rajtantra

Scroll To Top