दिनांक 22 March 2019 वेळ 1:10 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मच्छिमार युवकांसाठी सातपाटी येथे प्रशिक्षण

मच्छिमार युवकांसाठी सातपाटी येथे प्रशिक्षण

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 7 : राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र असलेल्या सातपाटी येथे सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन, सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जात असुन सध्याचे प्रशिक्षण वर्ग 1 जानेवारी 2019 पासून सूरू झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गात 22 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असुन इच्छूक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सहा महिन्यांच्या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार असून या प्रशिक्षण वर्गासाठी दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांना 100 रुपये प्रतिमाह तर दारिद्य्र रेषेवरील विद्यार्थ्यांना 450 रुपये प्रतिमाह प्रशिक्षण फी आकारण्यात येते. या प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज तसेच अधिक माहितीसाठी सातपाटी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे यांत्रिकी निर्देशक ज्ञानेश्वर भोसले यांच्या 8624919113 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पात्रता
1) उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे.
2) उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.
3) उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
4) उमेदवार क्रियाशील मच्छिमार असावा.
5) उमेदवारास किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

comments

About Rajtantra

Scroll To Top