दिनांक 27 May 2019 वेळ 6:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा नगरपंचायत विषय समितीची उद्या निवडणूक

वाडा नगरपंचायत विषय समितीची उद्या निवडणूक

>> काँग्रेसला उप नगराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता

WADA NAGARPANCHAYAT VISHAY SAMITIप्रतिंनिधी/वाडा : वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासह पाच विषय समितीच्या सभापती पदांसाठी उद्या, मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन या नगरपंचायतीमध्ये मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआयला सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली असल्याने सत्तास्थापनेवेळी झालेल्या करारानुसार समित्यांचे वाटप होईल असे चित्र आहे.

वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडून आले आहे. या पदावर शिवसेनेच्या गितांजली कोलेकर विराजमान असुन उपाध्यक्षासह बांधकाम समिती, पाणीपुरवठा समिती, महिला व बालकल्याण समिती, नियोजन व विकास समिती आणि शिक्षण समिती या पाच विषय समितीच्या सभापती पदाची एक वर्षाची मुदत संपल्याने या पदासाठी उद्या मंगळवारी निवडणूक होत आहे

वाडा नगरपंचायतीमध्ये एकुण 17 सदस्य संख्या असून यामध्ये शिवसेना 6, भाजपा 6, काँग्रेस 2, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आर.पी.आय. यांचा प्रत्येकी एक सदस्य असे संख्याबळ आहे. नगरपंचायतीच्या पहिल्याच वर्षी काँग्रेस व आरपीआयने शिवसेनेला पाठिंबा देऊन दोन विषय समिती सभापती पदे पदरात पाडून घेतली होती. व पुढील चार वर्षे इतर नगरसेवकांना सभापती पदाची संधी मिळावी म्हणून ठराविक कालावधीसाठी सभापती पदे देण्याच्या वाटाघाटी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता असुन शिक्षण समिती ही उपनगराध्यक्षांकडे असल्याने उर्वरित चार समित्यांपैकी सत्ताधारी सेनेला तीन समित्या व सहकारी पक्षांना एक समिती मिळण्याची शक्यता आहे.

तसेच या नगरपंचायतीमध्ये सहा सदस्य संख्या असलेल्या भाजपानेही विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असली तरी शिवसेनाच आपल्या सहकारी पक्षांसह समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित करेल, असा विश्वास शिवसेनेचे गटनेते संदीप गणोरे यांनी व्यक्त केला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top