दिनांक 27 May 2019 वेळ 6:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

पालघर येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

Rajtantra Media/पालघर दि. 07 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व पालघर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. 11) रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी 10 वाजता येथील लायन्स क्लब ऑफ पालघरच्या कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे.

या मेळाव्यास परिसरातील 15 नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदांच्या माहितीसह उपस्थित राहून उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड करणार आहेत. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण देणार्‍या शासनाने नियुक्त केलेल्या संस्था उपस्थित राहून उमेदवारांची निवड करणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध महामंडळांकडून विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.

या शिबिरास इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक व पालघर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top