दिनांक 17 February 2020 वेळ 11:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर जिल्ह्यात महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार -ज्योती ठाकरे

पालघर जिल्ह्यात महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार -ज्योती ठाकरे

SAVITRIBAI FULE JAYANTI-JYOTI THAKREY1वार्ताहर/बोईसर, दि. 6 : बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय त्यांना समाजात अपेक्षित असा मान-सन्मान मिळणे शक्य नाही. त्यासाठी पालघर जिल्ह्यात लवकरात लवकर महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचे प्रयत्न असून महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक-सामाजिक दृष्ट्या कमकुवत महिलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले.

आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर व युवराज्ञी येसुबाई महिला उद्योजक संघ बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त काल, शनिवारी सन्मान सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा बोईसर (वंजारी हॉल) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ठाकरे बोलत होत्या. यावेळी डॉ. लीना वर्तक, वैभवी पाटील, दिपाली पडघण, उज्ज्वला सूर्यवंशी, स्मिता माळवदे, वृषाली म्हात्रे, चंदना जाधव, सुमन किशोर पाटील, कांचन भालेराव आदी शैक्षणिक, सामाजिक, शासकीय, वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणार्‍या सामान्य ते अतिसामान्य महिलांना सन्मान सावित्रीच्या लेकींचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांची लक्षणीय उपस्थिती हे या सन्मान सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमात महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यावसायिक संधींचा उपयोग, व्यवसाय प्रशिक्षण, व्यवस्थापन आणि विक्री संदर्भात कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

SAVITRIBAI FULE JAYANTI-JYOTI THAKREY2कार्यक्रमास महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, सक्षम कन्या विकास संस्था अध्यक्षा विद्या गडाख, श्री शांतिनिकेतन फाऊंडेशनच्या (मुंबई) अध्यक्षा सुनीता काटकर, वसुंधरा फाउंडेशनच्या महाराष्ट्र अध्यक्षा मनीषा काटकर, सरावली ग्रामपंचायतीच्या सरपंच लक्ष्मी चांदणे, दलित पँथरचे अध्यक्ष अविश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालघरच्या आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कुर्‍हाडे, युवराज्ञी येसुबाई महिला उद्योजक संघाच्या बोईसर अध्यक्षा उर्मिला काटकर व महेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा गुंजाळ यांनी केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top