दिनांक 17 February 2020 वेळ 12:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पत्रकार हा समाजाचा आरसा -मेघना पाटील

पत्रकार हा समाजाचा आरसा -मेघना पाटील

PATRAKAR DIN-WADAप्रतिनिधी/वाडा, दि. 6 : समाजातील दुर्बळ घटकांना खर्‍या अर्थाने प्रवाहात आणण्याचे काम चोखपणे पत्रकार बजावत असतात. आपले कर्तव्य बजावत असताना वेळ प्रसंगी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी ते आपले कर्तव्य प्रामाणिक व पारदर्शकपणे बजावत असल्याने पत्रकार हा खर्‍या अर्थाने समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन वाडा पंचायत समितीच्या उपसभापती मेघना पाटील यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आंबिस्ते येथील अनाथ आश्रमात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्या हर्षाली म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, पत्रकार व राजकीय कार्यकर्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पत्रकार हे एखाद्या नेत्याला मोठेही करतात आणि त्या नेत्याने चुकीचे काम केले तर त्याला खाली खेचायलाही मागेपुढे पहात नसल्याचे सांगून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सह समन्वयक गोविंद पाटील यांनी पत्रकारांनीच मला राजकारणात मोठे केल्याचे आवर्जून सांगितले.

यावेळी काँग्रेसचे नेते स्व. मनोज म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रवेशद्वाराचे लोकार्पण यमुनाबाई म्हात्रे व भिवंडी महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना आच्छादने (ब्लँकेट) व खाऊचे वाटप करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. स्वर्गीय मनोज म्हात्रे यांच्या पत्नी व नगरसेविका वैशाली म्हात्रे यांना अंबामाता अनाथ आश्रमाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, उद्योजक नितीन चिकनकर, हर्षद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार दिलीप पाटील यांनी मानले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top