दिनांक 17 July 2019 वेळ 4:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा : दुचाकी अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी

मोखाडा : दुचाकी अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी

MOKHADA ACCIDENTप्रतिंनिधी/मोखाडा, दि. 6 : मोखाड्यावळील काजू पाडा येथे समोरून येणार्‍या प्रवासी वाहतूक गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.5) घडली. गणेश चंदर दुमाड (21) व देविदास गंगाराम दुमाड (20) अशी मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असुन संदीप दुमाड आणि पांडुरंग टोपले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मोखाडा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीवरून, येथील कर्मविर महाविद्यालयात शिकणारे गणेश दुमाड, देविदास दुमाड, संदीप दुमाड व पांडुरंग टोपले हे चौघे विद्यार्थी महाविद्यालय सुटल्यानंतर एकाच दुचाकीवरून घरी परतत होते. मोखाडा गावाजवळील काजुपाडा येथे भरधाव वेगात बसला ओव्हर टेक करण्याच्या नादात त्यांची दुचाकी विरुद्ध दिशेने येणार्‍या प्रवासी गाडीला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, गणेश दुमाड हा जागीच ठार झाला तर अन्य तिघांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ऊपचारासाठी नेत असताना, देविदास दुमाड मृत्यू पावला. तर संदिप व पांडुरंग यांची स्थिती गंभीर असल्याचे मोखाडा पोलिसांनी सांगितले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top