दिनांक 22 March 2019 वेळ 2:08 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वाडा : रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

2प्रतिनिधी
वाडा,दि.४ पोलीस दलाकडून २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पोलीस दला विषयी माहिती देऊन रेझिंग डे उत्साहात साजरा केला.
वाडा पोलिसस्टेशनमध्ये आयोजित या मार्गदर्शनपर कार्यक्रमात पी.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून होणारे दुष्परिणाम, पोस्को कायदा, मुला मुलींचे अपहरण, मुली महिलांची छेडछाड, वाढती गुन्हेगारी, महिला अत्याचार, कायदा व सुव्यवस्था बाधित राखणे याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस दलाकडून वापरली जाणाऱ्या हत्यारांची ओळख करून ते हाताळण्यास दिली.
याप्रसंगी पी.जे. महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक बि.के.पाटील, विनोद मुकणे दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top