दिनांक 21 February 2020 वेळ 10:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » ठवळपाड्यातील धोकादायक समाजमंदिर जमीनदोस्त कधी करणार ? ग्रामस्थांचा सवाल

ठवळपाड्यातील धोकादायक समाजमंदिर जमीनदोस्त कधी करणार ? ग्रामस्थांचा सवाल

5प्रतिनिधी
मोखाडा, दि.४ : तालुक्यातील नाशेरा ग्रामपंचायत हद्दीतील ठवळपाडा येथील समाजमंदिराच्या इमारतीची अक्षरशः पडझड झालेली असुन.मागील दोन वर्षांपासून समाजमंदिराची परिस्थिती जैसे थे च आहे.बाजूलाच जिल्हापरिषदेची शाळा असून बहूसंख्य विद्यार्थ्यांचा येथे मुक्त वावर असतो. मात्र तरीही संबंधीत विभागाकडून समाजमंदिराच्या दुरूस्ती बाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून एखादी अप्रिय घटना घडल्यावरच समाजमंदिर पाडण्याची कार्यवाही करणार का ? असा खडा सवाल विचारला जात आहे.

मौजे ठवळपाडा येथे सन १९९८-९९ दरम्यान दलीतवस्ती सुधार योजनेतून समाजमंदिर बांधण्यांत आलेले आहे.मात्र जीर्ण झालेल्या या समाजमंदिराची अवस्था कोणत्याही स्थितीत कोसळेलशीझालेली आहे.या समाजमंदिराला अगदी खेटूनच जिल्हा परिषदेची ४ थी ते ५ वी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे.येथे ४९ विद्यार्थी शिक्षण घेत असून मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावरही याठिकाणी विद्यार्थ्यांचा मुक्त संचार असतो. प्राथमिक शाळा व्यवस्थापनाने समाजमंदिराच्या दुरवस्थेबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती शाळेकडून मिळाली आहे.तसेच ग्रामस्थांनीही ही जागा बैठकीसाठी वापरात ठेवलेली असल्याने ही ईमारत कोसळली तर मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतांनाही मागील २ वर्षांपासून धोकादायक असलेल्या या इमारतीकडे किमान सुरक्षा फलक लावण्याचीही खबरदारी घेण्यांत आलेली नाही.

याबाबत मोखाडा पंचायत समितीशी संपर्क साधला असता त्याबाबत काय कार्यवाही केली त्याची चौकशी करून व मी प्रत्यक्ष पहाणी करून तसा प्रस्ताव जिल्ह्याला तातडीने पाठविण्याची तजविज करते असे मोखाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संगीता भांगरे – डहाळे यांनी सांगीतले आहे. तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता मागील आर्थिक वर्षात सदर ईमारत पाडण्याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविला असून त्यांचेकडून निधी उपलब्ध होत नसल्याने प्रस्तूत ईमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई खोळंबली असल्याचे जिल्हा परिषद मोखाडा बाधंकाम विभागाकडून स्पष्ट करण्यांत आले आहे.

दरम्यान अत्यावश्यक सुधारणांच्या कामांकडे समाजकल्याण विभागाने जातीने लक्ष देवून पडीत व मोडकळीस आलेल्या ईमारतींबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी ठवळपाडा ग्रामस्थांनी केलेली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top