दिनांक 17 February 2020 वेळ 11:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात युवकांच्या मानसिक आरोग्याविषयी कार्यशाळा संपन्न

दांडेकर महाविद्यालयात युवकांच्या मानसिक आरोग्याविषयी कार्यशाळा संपन्न

3राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर,दि.४ : आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही एक समाजसेवाच आहे. आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या मानसशास्त्र विभागामधील प्रोफेसर व कन्सलटंट डॉ. सुनिता निकुंभ यांनी केले. विद्यार्थ्यांचे मानसिक प्रश्न शिक्षकांनी समजून घ्यावे त्यांना मानसिक समस्येतून बाहेर काढता यावे याकरिता सोनोपंत दांडेकर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय आणि ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापकांसाठी ‘युवक आणि त्याचे मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत १५० शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. 

विद्यार्थ्यांची गुणवत्ता अचानक का घसरते, विद्यार्थी आत्महत्या का करतात? विद्यार्थी आक्रमक का होतात? त्यांच्या चिडचिडेपणा का येतो? शिक्षण अर्धवट सोडून का देतात? या विविध विशयांवर उद्बोधन शिबिरामध्ये चर्चा करुन उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉ. सोनल जगताप व डॉ. विवेक वसोया यांनी मानसिक रुग्णांच्या विविध केसेस शिक्षकांसमोर मांडल्या.

भारतामधील किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक असून भारत सर्वाधिक डिप्रेस्ड देश आहे. आज प्रत्येक सहा माणसांमागे एका माणसाला मानसिक आधाराची गरज आहे. ज्यांच्याकडे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक गुणांचा समतोल आहे अशी व्यक्ती सुदृढ असते. अशी उपयुक्त माहिती शिक्षकांना देण्यात आली.

युवकांच्या मानसिक आरोग्यास शिक्षकांच्या गुणवत्ता विकासासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे मत प्रा. महेश देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले. कार्यशाळेत उपप्राचार्य संजय महाजन, पर्यवेक्षक डॉ. हर्षद वनमाळी, प्रिती फणसेकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे मार्गदर्शन कार्यशाळेस लाभले. कार्यशाळा आयोजनासाठी सौ. विद्या पाटील व प्रा. विवेक कुडू यांनी विशेष मेहनत घेतली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top