दिनांक 17 February 2020 वेळ 1:27 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर : शॉर्ट सर्किटमुळे दोन घरं जळून खाक

पालघर : शॉर्ट सर्किटमुळे दोन घरं जळून खाक

PAGHAR GHAR AAGवार्ताहर/बोईसर, दि. 3 : पालघर जवळील पंचाळी-आगवण गावात मच्छिद्र जगु माच्छी व शिवाजी जगु माच्छी या दोन्ही भावांचे घर इलेक्ट्रिक शॉट सर्किटमुळे आग लागून खाक झाले आहे.

आज सकाळी 10 च्या सुमारास विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शार्ट सर्किट झाले त्यावेळी घरातील माणसे कामानिमित्त बाहेर तर मुलं शाळेत गेल्याने ही आग पसरत गेली व दोन्ही घरे जळून खाक झाली. सुदैवाने घरी कुणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही घरे 100 टक्के जळाल्याने मोठी वित्त हानी झाली आहे. दरम्यान, ही घटना कळताच गावच्या सरपंचांनी पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरे जळून खाक झाली होती.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top