दिनांक 17 February 2020 वेळ 12:16 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : भिंत अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

वाडा : भिंत अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

>> वाड्यातील नारे येथील घटना
>> संतप्त नातेवाईकांनी महामार्ग रोखला
>> कंपनीचीही केली तोडफोड

WADA KAMGAR MRUTYU2 Webप्रतिनिधी/वाडा, दि. 2 : तालुक्यातील नारे येथील जिप्सम (सेंट गोबेन) या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अंगावर भिंत कोसळल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष उर्फ राजेश सदाशिव पाटील (वय 38) असे सदर कामगाराचे नाव असुन कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी व दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरत संतप्त झालेल्या ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी काही काळ भिवंडी-वाडा महामार्ग रोखून धरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नारे गावाच्या हद्दीत असलेल्या जिप्सम या कंपनीत पीओपी शीटचे उत्पादन घेतले जाते. आज सकाळी 10 वाजून 20 मिनिटाच्या सुमारास मुसारणे येथील रहिवाशी असलेला संतोष कंपनीत काम करीत असताना त्याच्याच दुसर्‍या बाजूला जेसीबीद्वारे काम सुरु होते. ही जेसीबी सामान ठेवून बाहेर निघत असताना जेसीबीचा धक्का कंपनीतील भिंतीला लागला. दुर्दैवाने या भिंतीच्या शेजारीच काम करत असलेल्या संतोषच्या अंगावर ही भिंत कोसळल्याने त्याच्या डोक्याला व अंगावर गंभीर जखमा झाल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच घटनास्थळी जमा झालेल्या संतोषच्या नातेवाईकांनी कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच संतोषचा मृत्यू झाल्याचा आरोप करून प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. मात्र दुपारपर्यंत कंपनी प्रशासन काहीच भूमिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईक, ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी प्रारंभी मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला. त्यानंतर भिवंडी – वाडा महामार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.

WADA KAMGAR MRUTYU3या आंदोलनाची दखल घेत पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व मृत कामगाराचे नातेवाईक, राजकीय पदाधिकारी व कंपनी प्रशासनाबरोबर त्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केल्याने मृतदेह ताब्यात घेऊन नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • कंपनीची केली तोडफोड
    सकाळी घटना घडूनही चार वाजेपर्यंत कंपनी प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कंपनीची तोडफोड केली. यावेळी सुरक्षा रक्षकाच्या दालनातील व कंपनीच्या कार्यालयातील काचा फोडून नातेवाईकांनी आपला रोष व्यक्त केला.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top