दिनांक 21 January 2019 वेळ 5:53 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यातील विजय जोगमार्गे यांना आदर्श राज्य कलाध्यापक पुरस्कार

वाड्यातील विजय जोगमार्गे यांना आदर्श राज्य कलाध्यापक पुरस्कार

VIJAY JOGMARGEप्रतिनिधी/कुडूस, दि. 2 : चंद्रपूर येथे झालेल्या 40 व्या राज्य कलाशिक्षण परिषदेत उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी विद्यालयातील (उचाट) कला शिक्षक विजय जोगमार्गे यांना राज्य आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने शिक्षण उपसंचालक निलेश पाटील व महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विजय जोगमार्गे हे उत्कृष्ट चित्रकार असून ते एक लेखक व कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या व्यासंगाची दखल घेऊन राज्य कलाध्यापक संघाने त्यांच्या शैक्षणिक कामासाठी व संघटनात्मक कामातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला आहे. या परिषदेसाठी राज्यातील 6 हजारावर कलाशिक्षक उपस्थित होते. परिषदेतील रांगोळी, शिल्पकला, निसर्गचित्र, व्यक्ती चित्र, फलकलेखन आदी विषयावर जलरंग आणि विविध माध्यमातून कलाशिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.

परिषदेत स्वागताध्यक्ष म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण उपसंचालक निलेश पाटील, राज्य महामंडळाचे पदाधिकारी पी. आर. पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top