दिनांक 17 February 2020 वेळ 11:58 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

JAMSAR AAROGYA KENDRARajtantra Media/पालघर, दि. 2 : जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र सरकारच्या स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. पालघर सारख्या आदिवासी बहुल आणि नवीन जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून जिल्ह्यातील आरोग्य सोईसुविधा सुधारण्यासाठी सुरु असलेल्या अविरत प्रयत्नाचे हे फलित म्हणावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याप्रसंगी व्यक्त करतानाच जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अभिनंदन केले.

गेल्या ऑक्टोबरमध्ये दोन सदस्यांच्या समितीकडून पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात आली होती. यामध्ये अनेक निकषांवर जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वाधिक 83.2% गुण मिळाले. त्यानुसार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालयाने या केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान केले. तरी आरोग्य सुविधा तळागाळातील गरजू जनतेपर्यंत नेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील आणि आग्रही राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आणि जव्हार तालुक्याचे अति. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांचे अभिनंदन केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top