दिनांक 17 February 2020 वेळ 1:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » भिवंडी-वाडा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

भिवंडी-वाडा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

WADA ACCIDENT Webप्रतिनिधी/वाडा, दि. 1 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भिवंडी-वाडा महामार्गवर झालेल्या अपघातात 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जतीन गजानन भोईर असे सदर तरुणाचे नाव असुन अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तालुक्यातील गायगोठा (निंबवली) येथील मूळचा रहिवाशी असलेला जतीन रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास एम.एच. 04 एच. क्यू.6115 क्रमांकाच्या दुचाकीवरून वाड्याहून चिंचघर येथे जात असताना शिरीष पाडा व पाहुनी पाड्यादरम्यान अज्ञात वाहनाने जतीनच्या दुचाकीला धडक देऊन टायर खाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाख करण्यात आला असुन वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top