दिनांक 17 February 2020 वेळ 12:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मध्यवैतरणा-कसारा रस्त्याचे भवितव्य अधांतरी

मध्यवैतरणा-कसारा रस्त्याचे भवितव्य अधांतरी

MOKHADA RASTA

>> दोन विभागात रस्ता धोक्यात  >> उत्तरदायित्व घेणार कोण?  >>प्रवाशांचा खडा सवाल!

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 1 : तालुक्यातील खुद्द मोखाड्यापासून विहीगाव पर्यंतच्या रस्त्यावर बहूतांश ठिकाणी अद्ययावतीकरणाची नितांत आवश्यकता असताना या राज्यमार्गावरील मस्त नात पुलापासून पुढे कसार्‍याकडील रस्ता कोणाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट नसल्याने रस्त्याचे अद्ययावतीकरण खोळंबले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

मोखाडा – खोडाळा – विहींगांव हा राज्यमार्ग दर्‍या-खोर्‍यांनी वेढलेला आहे. मध्यवैतरणा प्रकल्पापासून पुढे तर उजव्या बाजूला 1 हजार फुट खोल दरी आणि विस्तीर्ण जलप्रदेशातून मार्ग काढत वाहनांना मार्गक्रमण करावे लागते. मात्र या ठिकाणी कुठे अपघातजन्य परिस्थितीतून बचावासाठी संरक्षक कठडे, रेलींग, सुरक्षाफलक, दिशादर्शके, रेडीयम आणि आवश्यक तीथे मोर्‍या व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. किरकोळ दुरुस्त्या वगळल्या तर या रस्त्याची अवस्था ही बाबा आदमच्या जमान्यातलीच आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रियाशिलतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान या राज्यमार्गाची देखभाल दुरूस्ती ही मोखाडा उपविभागाने करायची की शहापुर उपविभागाने, याबाबत एकमत समजत नाही. मागील वर्षी विहीगांव हद्दीत रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी शहापुर उपविभागाने मध्यवैतरणा प्रकल्पापासून कसार्‍याकडील रस्ता त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी नोंदवल्याची माहिती मोखाडा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून मिळाली आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून हस्तांतरणाचे प्रस्तावही ठाणे कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे पाठवल्याचे समजते. मात्र हा रस्ता त्यांच्याकडे हस्तांतरीत झाला किंवा कसे याबाबत खात्रीशीर उत्तर नसल्याने या रस्त्याचे नक्की उत्तरदायीत्व कोणाकडे? यावर प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

याबाबत मोखाडा सार्वजनिक उपविभागाशी संपर्क साधला असता हस्तांतरणा बाबतचा पत्रव्यवहार जव्हार कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून झाला असून पुन्हा या उपविभागाडूनही त्याबाबत पत्र देऊन खातरजमा करण्यात येणार असल्याचे उपअभियंता दिलीप बावीस्कर यांनी सांगितले आहे. तसेच शहापुर उपविभागाने अर्थसंकल्पातून अडीच कोटी रूपये उपलब्ध केले असल्याने जवळ-जवळ मध्यवैतरणापासून पुढील रस्ता शहापुर उपविभागाकडे हस्तांतरीत झाला असल्याची संदिग्ध ग्वाही बावीस्कर यांनी दिली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top