दिनांक 19 June 2019 वेळ 3:27 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ!

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ!

>> मतदारांनी माहिती जाणून घ्यावी -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे

EVM VVPATRajtantra Media/पालघर दि. 28 : ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असुन त्यानुसार पालघर तालुक्यातील सातपाटी गावात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येतात. काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडे केले आहे. या पार्श्‍वभुमीवर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार असुन व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदारांना त्यांनी कोणत्या उमेदवाराला मत दिले याबाबतची खात्री पटणार आहे. या यंत्राबाबत पालघर जिल्ह्यातील सर्व मतदारांना माहिती होण्याकरीता या यंत्राची प्रात्यक्षिके (डेमोे) दाखविण्याचा जनजागृती कार्यक्रम काल, गुरुवारपासुन सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत सातपाटी मच्छी मार्केट येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन, पालघर विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी विनोद खिरोळकर व पालघरचे तहसिलदार महेश सागर उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यात आली व मतदारांनी त्यांची मते नोंदविली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. नारनवरे यांनी केले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top