दिनांक 18 June 2019 वेळ 7:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » शुल्लक वादातून गोळी झाडणार्‍या तिन आरोपींना अटक

शुल्लक वादातून गोळी झाडणार्‍या तिन आरोपींना अटक

Wadaप्रतिनिधी/वाडा, दि. 19 : शुल्लक कारणावरुन झालेल्या बाचाबाचीतून तरुणांवर बंदुकीने गोळी झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 3 आरोपींना वाडा पोलीसांनी मंगळवारी रात्री अटक केली असुन न्यायालयाने तिघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वसई तालुक्यातील सायवन येथील रहिवाशी सुरज संतोष कामडी हा आपल्या मित्रांसोबात वाड्यातील केळठण गावाच्या हद्दीतील मंदाकिनी डोंगरावर 14 डिसेंबर रोजी सहलीसाठी आला होता. त्यांच्याच मागे आलेल्या संजय पाडोसा, विष्णू भोपी व अजय गणेशकर यांच्यापैकी पाडोसा याने तु सहलीसाठी माझी गाडी भाड्याने का घेतली नाहीस असे विचारत सुरज कामडीशी वाद घातला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची सुरु असतानाच पाडोसा याने विष्णू भोपी याच्याकडील ठासणीची बंदूक घेऊन सुरज कामडी व त्याच्या मित्रांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. तर याप्रकरणी त्यांच्याविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307, 504, 506, 34 सह आर्म अ‍ॅक्ट कलम 3,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काल, मंगळवारी रात्री पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बंदूक हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान, या तिघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top