रोहयो अंतर्गत पाथर्डी येथे जॉब कार्ड मेळावा संपन्न

0
15

JAWHAR JOB CARD MELAVAप्रतिनिधी
जव्हार, दि. 19 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांकरिता जॉब कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नविन जॉब कार्डांचे वाटप, जुन्या जॉबकार्ड धारकांच्या समस्यांचे निराकरण तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यासाठी शासनामार्फत रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण व शेतीशी निगडीत अनेक कामे तालुक्यात सुरु आहेत. या योजनेअंतर्गत पंचायत समितीतर्फे तालुका गट विकास अधिकारी शेखर रौदळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी गावातील 18 वर्षावरील स्थानिकांना जॉब कार्ड उपलब्ध करून देणे, जुन्या जॉब कार्ड संदर्भातील अडचणी सोडवणे, नवीन नाव जोडणे, विभक्त करणे, नावातील अडचणी तसेच विविध योजनेतील कामांची माहिती देणे आदींसाठी या जॉब कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येन ग्रामस्थांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.
ग्राम सुधार समितीसह गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती सोमनाथ किरकिरे व सरंपच सुमित्रा सोळे यांच्या सहयोगाने हा मेळावा पार पडला. मेळाव्यास मनीष चव्हाण, टाटा मोटर्सच्या सी.एस.आर. विभागाचे पावन सोनी आणि बायफ संस्थेचे गोरक्षनाथ भोर, नचिकेत मेटकर, पंकज परदेशी आणि मनोज पवार उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

Print Friendly, PDF & Email

comments