दिनांक 22 March 2019 वेळ 1:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मनोर : तब्बल तीस वर्षानंतर पालवी पाड्यात पोहोचली वीज

मनोर : तब्बल तीस वर्षानंतर पालवी पाड्यात पोहोचली वीज

MANOR PALVIPADA VEEJप्रतिनिधी
मनोर, दि. 18 : तीन दशकं विजेविना अंधारात राहणार्‍या नांदगाव हद्दीतील पालवी पाड्यात मंगळवारी (ता.18) अखेर वीज पोहोचली. नांदगावचे सरपंच पवन सवरा आणि ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने महावितरणच्या सौभाग्य योजनेअंतर्गत पालवी पाड्यातील हा 30 वर्षांचा अंधार संपला.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नांदगावच्या पालवी पाड्यात सुमारे वीस आदिवासी कुटुंब गेल्या तीस वर्षांपासून राहत आहेत. मनोर नजीक आणि महामार्गापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असूनही येथे वीज पोहीचली नव्हती. विजेविना येथील आदिवासी बांधवांची होणारी अडचण नांदगावचे नवनिर्वाचित सरपंच पवन सवरा यांच्या निदर्शनास आली व त्यांनी पालवी पाड्यात वीज पोहचावी यासाठी ग्रामपंचायती मार्फत पाठपुरवठा सुरु केला. अखेर त्यांच्या वर्षभराच्या प्रयत्नांना यश आले. महावितरणच्या सौभाग्य योजनेअंतर्गत पालवी पाड्याला आजपासुन वीज पुरवठा सुरु करण्यात आला. येथील कुटुंबाना मोफत वीज जोडणी देण्यात आली आहे.

यावेळी आशा गायकवाड, महावितरणचे अभियंता मनोज देशमुख आणि पालवी पाड्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top