दिनांक 21 January 2019 वेळ 4:47 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाडा : विविध मागण्यांसाठी माकपचा वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोचा

वाडा : विविध मागण्यांसाठी माकपचा वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोचा

WADA MORCHAप्रतिनिधी
वाडा, दि. 17 : कायदा होऊनही वनपट्टे दावेदारांची हेळसांड सुरूच आहे, दावेदारांना त्रास दिला जात आहे, वनपट्टे मिळण्यास वनअधिकारी अडथळा निर्माण करत आहेत तसेच अत्यंत बेजबाबदारपणे वनाधिकारी वागत आहेत असे अनेक आरोप करत भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) वाडा तालुक्याच्या वतीने आज, सोमवारी वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घातला होता.

जी.पी.एस. मोजणी प्रमाणे क्षेत्र दावेदारांना देण्यात यावे, मोजणीनंतर क्षेत्रामध्ये फेरबदल करणे बंद करा, तालुकास्तरीय कमिटीने सह्या केल्यानंतर फेरबदल करणे बंद करा, वनजमीन क्षेत्रात विकास कामात अडथळा निर्माण करणे बंद करा, दावेदारांना शेती व शेतीपूरक कामे दाव्यातील वनजमिनी मध्ये करण्यास बंद करणे टाळा, नोटीस देणे बंद करा, वन अधिकार्‍याकडून होणारा त्रास बंद करा, डिसेंबर 2018 पर्यंत दावेदारांना पट्टे मिळण्यास मदत करा, रोजगार हमी अंतर्गत कामे करून दावेदारांना विकास कामांचा लाभ द्या तसेच वनराई बंधारे बांधून पाणी व्यवस्था करा, दावेदारांची चुकलेले सर्वे नंबर दुरुस्त करून द्या, अशा विविध मागण्यांसाठी तब्बल चार तास मोर्चेकर्‍यांनी वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घातला होता. सदर मोर्चाचे नेतृत्व तालुका सचिव कॉ. सुनील धानवा यांनी केले होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top