दिनांक 18 June 2019 वेळ 6:36 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर येथे 22 ते 24 डिसेंबर दरम्यान सरस प्रदर्शनाचे आयोजन

पालघर येथे 22 ते 24 डिसेंबर दरम्यान सरस प्रदर्शनाचे आयोजन

LOGO-4-Onlineप्रतिनिधी

पालघर, दि. 17 : दारिद्य्र रेषेखालील कुटूंबांचे जीवनमान उंचविण्यासाठी व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी पालघर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक 22 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2018 या कालाधीत पालघरमधील आर्यन शैक्षणिक संस्थेच्या मैदानात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सरस प्रदर्शनमध्ये महिला स्वयंसहाय्यता समुहांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू व कलाकुसरीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर या प्रदर्शनामध्ये दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत ग्रामीण युवकांना स्वयंरोजगार संबंधित मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या प्रदर्शनात मांडण्यात येणार्‍या वस्तूंना बाजारपेठ मिळावी या हेतूने जिल्ह्यामधील शॉपींग मॉलचे व्यवस्थापन तसेच औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. महिला स्वयंसहाय्यता समुहांच्या कामाची ओळख बँकांना होण्यासाठी विविध बँकाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनास पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा आणि बचतगटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top