दिनांक 21 September 2019 वेळ 6:03 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वर्सोवा पुल दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक पोलिसांची चांदी! 500 ते 1000 रुपये घेऊन सोडली जाताहेत अवजड वाहन

वर्सोवा पुल दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक पोलिसांची चांदी! 500 ते 1000 रुपये घेऊन सोडली जाताहेत अवजड वाहन

VAHTUK POLICE CHANDIप्रतिनिधी
मनोर, दि. 7 : महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामास मागील शुक्रवारी (दि. 7) सुरुवात करण्यात आली आहे. दुरुस्तीच्या काळात अवजड वाहतूक वाडा-भिवंडी या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मात्र अपुरे मनुष्यबळ आणि नियोजनाच्या अभावामुळे महामार्गावरील मस्तान नाका ते नांदगावपर्यंत अवजड वाहनांच्या रांगा लागत आहेत. याचाच फायदा घेत येथे कार्यरत असलेले वाहतूक पोलीस या अवजड वाहनांच्या चालकांकडून पैसे घेऊन मस्तान नाक्यावरून चिंचोटीच्या दिशेने गाड्या सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

वर्सोवा पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकार्‍यांनी अधिसूचना काढली. त्यानुसार महामार्गावरील अवजड वाहने मस्तान नाका उड्डाण पुलाआधी अडवून टेन नाका येथून वाडा-भिवंडी मार्गावर वळवली जातात. त्यासाठी मस्तान नाका पुलावर लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
मस्तान नाका येथे पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत अवजड वाहनांच्या रांगा लागतात. तसेच अवजड वाहतूक वाडा-भिवंडी मार्गावरून वळवल्याने तेथेही वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. तर वाडा-भिवंडी मार्गावर दोन अधिक टोल भरावे लागतात. तसेच वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ आणि इंधन वाया जाते. यातून मार्ग काढण्यासाठी वाहनचालक वाहतूक पोलिसांना पैसे देऊन आपले वाहन मस्तान नाका पुलावरून मुंबईकडे सोडण्यासाठी पैसे देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. एक वाहन चालकाकडून पाचशे ते हजार रुपये स्वीकारून वाहने पुलावरून मुंबईकडे सोडली जातात. यातून मोठा मलिदा वाहतूक पोलीस आणि कर्मचारी कमावतात, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top