दिनांक 03 July 2020 वेळ 4:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » आधारभूत धान्य खरेदी केंद्रांकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

आधारभूत धान्य खरेदी केंद्रांकडे शेतकर्‍यांनी फिरवली पाठ

>> एकाधिकार केंद्रे सुरू करण्याची मागणी.
>> खुल्या बाजारात विकावे लागते धान्य.
>> कर्मचार्‍यांची कमतरता.
>> हफ्त्यातून एकच दिवस उघडते केंद्र.

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 13 : तालुक्यात सर्वत्र आदिवासी विकास महामंडळाने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र अशा एकजिनशी खरेदी केंद्रांकडे तालुक्यातील आदिवासी शेतकर्‍यांनी सपशेल पाठ फिरवल्याने अशी कुचकामी ठरलेली केंद्रे बंद करून तालुक्यात सर्वत्र एकाधिकार धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

मोखाडा तालुक्यात पळसुंडा, मोखाडा आणि खोडाळा येथे आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यंदा ओढवलेल्या दुष्काळी पिकपरिस्थीमुळे येथील भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर मुबलक प्रमाणात भात येत नाही. त्यातच खरेदी केंद्राकडून धनादेशाद्वारे रक्कम अदा होत असल्याने रोजच्या उपजिवीके पुरती धान्य विकणार्‍या शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होत आहे. आधारभूत धान्य खरेदी केंद्रे ही, असून अडचण नसून खोळंबा ठरलेली असल्याने ही संपूर्ण खरेदी केंद्रे बंद करून एकाधिकार धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी आदिवासी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

 • एकाधिकार दरपत्रक प्रलंबित
  सुरूवातीलाच धान्य खरेदी केंद्रे सुरू केली असली तरी एकाधिकार खरेदीचे दर दीर्घकाळ प्रलंबित असल्याने आधारभूत केंद्रे असून नसल्यासारखीच आहेत. त्यामूळे प्रादेशिक कार्यालयाने एकाधिकारचे दरपत्रक तातडीने उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त असतानाही त्याबाबत कमालीची चालढकल होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
 • हफ्त्यातून एकच दिवस उघडतात केंद्रे
  मोखाडा तालुक्यात सर्वत्र आठवडी बाजाराच्या दिवशीच खरेदी केंद्रे उघडली जातात व इतर वारी बंद ठेवली जातात. त्यामुळे त्याबाबतची कल्पना नसलेल्या शेतकर्‍यांना केंद्रावरून विन्मूख परतावे लागत आहे. किमान एकाधिकारचे दरपत्रक उपलब्ध झाल्यावर तरी खरेदी केंद्रे संपूर्ण आठवडाभर सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
 • शेतकर्‍यांनी करायचे काय ?
  एकीकडे एकाधिकारचे दरपत्रक नाही तर दुसरीकडे कर्मचार्‍यांचा तुटवडा, अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी कोणाकडे हात पसरायचे? असा संतप्त सवाल येथील प्रगत शेतकरी उमाकांत हमरे यांनी विचारला असून महामंडळाने त्याची पूर्तता न केल्यास शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा हमरे यांनी दिला.

याबाबत जव्हारचे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र नारायण रणमाळे यांच्याशी संपर्क साधला असता एकाधिकारचे दरपत्रक उपलब्ध होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे तात्पूरत्या स्वरूपात आधारभूत धान्यखरेदी सुरू केली आहेत. एकाधिकार दरपत्रक उपलब्ध होताच तशी केंद्रे सुरू करण्याची तजविज ठेवली असल्याचे तसेच संपूर्ण प्रादेशिक विभाग केवळ 37 कर्मचार्‍यांवरच चालवला जात असल्याने कर्मचार्‍यांचा तुटवडा भासतो त्यामुळे आठवड्यातुन एकच दिवस केंद्रे चालवावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला आदिवासी विकास महामंडळाने धान्य खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. केंद्रांकडील धान्य दर उपलब्ध असल्याने ही केंद्रे आधारभूत केंद्रे म्हणून सुरू करून शेतकर्‍यांची तोंडे बंद करण्याचा दुबळा प्रयत्न महामंडळाने केला आहे. कर्मचार्‍यांचा भरघोस अनूशेष व एकाधिकार दरपत्रकाची वाणवा, या गोष्टी आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदार संघात घडत आहेत व शेतकरी वेठीस धरला जात आहे. ही लाजीरवाणी बाब असल्याची टिका जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश निकम यांनी केली आहे.

 • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
 • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
 • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top