दिनांक 22 March 2019 वेळ 1:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयात विचारवेध व्याख्यान संपन्न!

दांडेकर महाविद्यालयात विचारवेध व्याख्यान संपन्न!

> शिकावं कसं हे शिकलं पाहिजे -आनंद करंदीकर

????????????????????????????????????

पालघर, दि. 11 : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता वाढवून शिकावं कसं, हे शिकलं पाहिजे. आपण स्वतःला नेहमी अद्ययावत ठेवले तरच रोजगार क्षेत्रात आपला टिकाव लागेल, असे प्रतिपादन समाजशास्त्राचे अभ्यासक आनंद करंदीकर यांनी केले. विचारवेध आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार निर्मिती आणि विषमता निर्मूलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात स्त्रीमुक्तीवादी अभ्यासक श्रीमती सरिता आवाड व माहिती तंत्रज्ञान अभ्यासक विनायक पंडित यांनी रोजगार निर्मिती संबंधी विचार मांडले.

वर्तमान तंत्रज्ञान तुम्हाला अधिक मुक्त व स्वतंत्र होण्याची एक नामी संधी देते, म्हणून तंत्रज्ञानाच्या प्रगतीला भिण्याचे कारण नाही असे विचार पंडित यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांसमोर मांडले. तंत्रज्ञानामुळे ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसाराचे लोकशाहीकरण झाले आणि ते मानवी प्रगती करीता उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले. स्त्रिया आणि रोजगार या विषयावर मत प्रतिपादन करताना, स्त्रिया शिक्षण घेत आहेत परंतु त्या रोजगार क्षेत्रात अल्प प्रमाणात आहेत. स्त्रियांनी रोजगार मिळविण्याचा व ते टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन श्रीमती आवाड यांनी केले. आज खेडोपाडी ब्युटीपार्लर्स उपलब्ध आहेत. परंतु स्त्रियांच्या मुलभूत सुविधांची वानवा आहे, या गोष्टींचा विचार तरुण मुलींनी केला पाहिजे, असेही मत त्यांनी मांडले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांना सभोवतालच्या परिस्थितीचे सुक्ष्म अवलोकन करुन आपल्या विचारांचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी आपल्या मनोगतात विचारवेध सारखे उपक्रम समाजाचे वैचारिक परिपोषण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष धनेश वर्तक, पत्रकार समीर मणीयार, व्यवस्थापन समितीचे सदस्य धराधर पाटील, अमिता राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अतिथींचा परिचय व आभार मराठी विभागप्रमुख प्रा. विवेक कुडू यांनी मानले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top