दिनांक 18 June 2019 वेळ 6:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर तसेच शेतजमिनीच्या खातेफोडीसाठी विशेष शिबिरांमध्ये सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी

जमिनीचे बिनशेतीमध्ये रूपांतर तसेच शेतजमिनीच्या खातेफोडीसाठी विशेष शिबिरांमध्ये सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी

पालघर, दि. 11 : पालघर जिल्ह्यातील अंतिम विकास योजना/ अंतिम प्रादेशिक योजना क्षेत्र तसेच गाव, नगर किंवा शहराच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आत परीघीय क्षेत्रातील खातेदारांना आपल्या जमिनी अनुज्ञेय वापर प्रयोजनासाठी बिनशेतीमध्ये रुपांतरीत करावयाच्या असल्यास तसेच ज्या खातेदारांना शेतजमिनीची खातेफोड करावयाची आहे, अशा खातेदारांनी येत्या 14 डिसेंबर 2018 ते 21 जानेवारी 2019 या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये मंडळ निहाय आयोजित होणार्‍या शिबिरांमध्ये आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण, भाग चार, दिनांक 05 जानेवारी 2017 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 चे कलम 42 ब व 42 क मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अनुक्रमे अंतिम विकास योजना/ प्रादेशिक विकास योजना क्षेत्रातील जमिनींसाठी अकृषिक वापराच्या रुपांतरणाची तरतूद केलेली आहे. तसेच महसूल व वन विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 42 ड नुसार कोणत्याही गावठाण जमिनीच्या कलम 122 खालील घोषीत हद्दीपासून 200 मीटरच्या परीघीय क्षेत्रातील जमिनीच्या अकृषिक रुपांतरणाबाबतची तरतूद केली आहे.

या सुधारणांच्या अनुषंगाने ज्या जमिनी निवासी, वाणिज्यीक अथवा इतर अकृषिक स्वरुपाच्या वापर विभागात आहेत, त्याबाबत संबंधित नियोजन प्राधिकार्‍यांकडून माहिती प्राप्त करुन घेऊन संबंधित खातेदारांनी शिबिरात अर्ज दाखल करावयाचा आहे. सदर अनुज्ञेय वापर प्रयोजनानुसार त्यांच्या मालकीच्या भोगवटादार वर्ग-1 जमिनीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 कलम 42 ब, 42 क व 42 ड अन्वये मानीव रुपांतरण होण्याच्या दृष्टीने रुपांतरीत कर व अकृषिक आकारणीची रक्कम निश्चित करुन सदर रक्कम भरणा करता येईल. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 चे कलम 85 नुसार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील व्यक्तींच्या शेतजमिनीची खातेफोड करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असुन संबंधित शेतकर्‍यांनी 7/12 व आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले अर्ज संबंधित तहसिलदारांकडे करावे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे.

> शिबिरांचे मंडळ, दिनांक आणि स्थळनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

पालघर तालुका :- पालघर – 21/12/2018 आणि 21/01/2019 रोजी सकाळी 11 वाजता मंडळ अधिकारी कार्यालय पालघर. बोईसर-21/12/2018 आणि 21/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय बोईसर. सफाळा/आगरवाडी – 21/12/2018 आणि 21/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय सफाळा तसेच मंडळ अधिकारी कार्यालय आगरवाडी. मनोर- 21/12/2018 आणि 21/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय मनोर. तारापूर- 21/12/2018 आणि 21/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय तारापूर.
डहाणू तालुका :- मल्याण- 20/12/2018 आणि 10/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. दशश्री माळी हॉल, डहाणू-20/12/2018 आणि 10/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. पंचायत समिती सभागृह, डहाणू. चिंचणी- 20/12/2018 आणि 10/01/2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, चिंचणी. कासा – 21/12/2018 आणि 11/01/2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हॉल, कासा. सायवन- 21/12/2018 आणि 11/01/2019 रोजी बापुगाव प्राथमिक शाळा, सायवन.
तलासरी तालुका:- तलासरी/झरी- 21/12/2018 आणि 16/01/2019 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय तलासरी आणि मंडळ अधिकारी कार्यालय झरी.
जव्हार तालुका:- जव्हार 14/12/2018 आणि 18/01/2019 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय जव्हार. साखरशेत- 14/12/2018 आणि 18/01/2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालय चालतवड. जामसर-14/12/2018 आणि 18/01/2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जामसर.
वाडा तालुका:- वाडा/कूडूस- 28/12/2018 आणि 08/01/2019 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय कुडूस. कंचाड/कोने – 28/12/2018 आणि 08/01/2019 रोजी तलाठी सजा आबिटघर
विक्रमगड तालुका:-  विक्रमगड/तलवाडा- 21/12/2018 आणि 18/01/2019 रोजी समाज मंदीर, शिळ तसेच 21/12/2018 आणि 19/01/2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालय खडकी.
मोखाडा तालुका :- मोखाडा/खोडाळा- 20/12/2018 आणि 19/01/2019 रोजी तहसिल कार्यालय मोखाडा तसेच 21/12/2018 आणि 19/01/2019 रोजी मंडळ अधिकारी कार्यालय खोडाळा.
वसई तालुका :- मांडवी- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय मांडवी. विरार- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय विरार. आगाशी- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय आगाशी. निर्मळ- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय निर्मळ. माणिकपूर- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय माणिकपूर. वसई- 19/12/2018 आणि 15/01/2019 रोजी सकाळी 11.00 वा. मंडळ अधिकारी कार्यालय वसई.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top