दिनांक 18 June 2019 वेळ 6:07 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित

प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांचे “आदिवासी बोधकथा” पुस्तक प्रकाशित

AADIWASI BODHKATHA EnglishRajtantra Media/डहाणू दि. १०: येथील कष्टकरी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ समाजसेवक दांपंत्य प्रदीप प्रभू व शिराझ बलसारा यांनी संकलित केलेल्या “आदिवासी बोधकथा – एक पुनर्कथन ” या मुळ इंग्रजीत संकलित केलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या एका शानदार कार्यक्रमात पार पडले. यावेळी आदिवासी कवी वाहरु सोनावणे, प्रसिद्ध साहित्यिका ऊर्मिला पवार, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विलास पोसम, पुस्तकाचे मराठी अनुवादa2क सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा, प्रकाशक अरविंद पाटकर यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदीप व शिराझ यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी भागात काम करतांना येथील लोकांच्यात सांगितल्या गेलेल्या बोधकथांचे संकलन केले होते. इंग्रजीत संकलित केलेल्या या बोधकथांचे ” Wisdom from the Wilderness ” हे इंग्रजी पुस्तक देखील प्रकाशित झाले असून सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करुन पुनर्कथन केले आहे. या निमित्ताने आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक अनमोल असा ग्रंथ उपलब्ध झाला आहे. अशाच संकलित बोधकथांची आणखी पुढील पुस्तके देखील प्रकाशनाच्या वाटेवर असल्याची माहिती देखील प्रदीप प्रभू यांनी यावेळी बोलताना दिली. मनोविकास प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाची किंमत अवघी २५० रुपये ठेवण्यात आलेली आहे.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top