दिनांक 18 June 2019 वेळ 6:16 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन टास्क फोर्सची स्थापना

शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी मिशन टास्क फोर्सची स्थापना

>> जिल्ह्यात 4500 बालके शाळाबाह्य
>> ड्रॉप बॉक्स संख्या शुन्यावर आणणार?

SHALABAHYA MULEदीपक गायकवाड/मोखाडा, दि. 10 : पालघर जिल्ह्यातील 4500 बालके शाळाबाह्य तर 2955 बालके स्थलांतरीत असल्याचे समोर आल्याने अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मिशन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय ड्रॉप बॉक्समधील मुलांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी व्यापक मोहिम उभारणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या मोहिमे अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व शाळांमधील सरल पोर्टरवरील ड्रॉप बॉक्समध्ये असलेल्या बालकांसह इतर स्थलांतरीत बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मिशन ड्रॉप बॉक्सचे सचिव तथा जिल्हा (प्राथमिक) शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगीतले आहे. या समितीची पहिली बैठक येत्या 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

> अशी असेल मिशन टास्क फोर्स समिती

  • जिल्हाधिकारी – अध्यक्ष
  • जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी -उपाध्यक्ष
  • पोलीस अधिक्षक – सदस्य
  • जि. प. महिला व बालकल्याण अधिकारी – सदस्य
  • पालघर प्रकल्प अधिकारी – सदस्य
  • पालघर बालहक्क आयोग अध्यक्ष – सदस्य
  • कामगार आयूक्त पालघर – सदस्य
  • शिक्षणाधिकारी (माध्यमिक) – सदस्य
  • शिक्षणाधिकारी (प्राथमिक) – पदसिद्ध सचिव

या समितीमार्फत शाळाबाह्य मुलांसाठी सर्वार्थाने व्यापक चळवळ उभारण्यात येणार असून तालुका स्तरावर देखील अशीच समिती गठीत करून धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे मिशन टास्क फोर्सचे पदसिद्ध सचिव राजेश कंकाळ यांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top