दिनांक 18 June 2019 वेळ 7:10 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वर्सोवा पुलाच्या कामामुळे मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर वाहतूककोंडी

वर्सोवा पुलाच्या कामामुळे मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर वाहतूककोंडी

WADA BHIVANDI MAHAMARG VAHTUK KONDIप्रतिनिधी/वाडा, दि. 9 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी या पूलावरील वाहतूक बंद करून ती मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण कामांनी ग्रासलेल्या या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच अपघातांचा धोका देखील वाढला आहे.

वर्दळीचा मार्ग समजल्या जाणार्‍या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास दीड महिना हा पुल अवजड वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील वाहतूक इतर पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. यात मनोर-वाडा-भिवंडी महामार्ग सोयीचा ठरत असल्याने सर्वात जास्त वाहतूक या मार्गावरुन होत आहे. मात्र या महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण असून आजही अनेक ठिकाणी रस्ता एकेरी आहे. या महामार्गावर कोणतेही सूचना फलक आजपर्यंत लावण्यात आलेली नाही तसेच जागोजागी दुभाजक व रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे पिंजाळ व देहेर्जे नदीवरील पूल अपूर्ण अवस्थेत असल्याने जुन्याच पुलावरून वाहतूक आहे. परिणामी हा पूल धोकादायक बनला असुन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

खरतर मनोर-वाडा-भिवंडी मार्गावरून वाहतूक वळविताना या मार्गाचे काम पुर्ण करणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे अपघातांना आमंत्रण दिल्याची खंत वाहन चालक व्यक्त करत आहेत. दरम्यान, दिवस रात्र या मार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असुन एस.टी. बसचे वेळपत्रक कोलमडले आहे. तर ठाणे, भिवंडीला जाणार्‍या नोकरवर्गासह विद्यार्थ्यांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील रस्त्यांची शक्य तितकी कामे पूर्ण करावीत व कुडूस तसेच वाडा येथील मुख्य नाक्यावरील अनधिकृत फेरीवाले व पार्किंग हटवावी, अशी मागणी केली जात आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top