पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

0
11

WADA TARUN MRUTYUप्रतिनिधी/वाडा, दि. 9 : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहुन शिंदेवाडी येथे आलेल्या दोन तरुणांचा तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने शिंदेवाडी येथे दुःखद शांतता पसरली आहे.

रविवारच्या सुट्टीची मजा घेण्यासाठी मुंबई येथील मालाडहुन जवळपास 35 जण सकाळी तालुक्यातील शिंदेवाडी (उचाट) येथील शिंदे परिवाराकडे आले होते. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा माघारी परतण्याचा त्यांचा बेत असतानाच दुपारी 12 वाजताच्या सुमारास पाच ते सहा तरुण तानसा नदीवर फेरटका मारण्यासाठी गेले होते. त्यापैकी प्रसाद शिंदे (वय 26) व अनिष मोरे (वय 25) हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना समजताच गावकर्‍यांनी दोघांना पाण्यातुन बाहेर काढून खुपरी येथील कल्याणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वैद्यकीय अधीक्षक प्रदीप जाधव यांनी दोघेही मयत झाले असल्याचे सांगितले.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments