दिनांक 21 May 2019 वेळ 10:29 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

DIVYANG VIDYARTHI SPARDHARajtantra Media/पालघर, दि. 7 : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत पालघरमधील स. तू. कदम शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून निवडण्यात आलेले जिल्ह्यातील अंध, मुकबधिर, मतिमंद, बहुविकलांग विद्यार्थी पुढे राष्ट्रीय पातळीवर जिल्हाचे प्रतिनिधित्व करतील आणि क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील 17 अनुदानित आणि 12 विनानुदानित अशा एकूण 29 शाळा सहभागी झाल्या असुन यामध्ये 50, 100, 200, 400 आणि 800 मी. धावणे, गोळाफेक, सॉफ्ट बॉल थ्रो, सिटींग लॉंग जंप, स्टँडिंग लॉंग जंप, 25 मी. चालणे, 50 मी धावणे, बुद्धिबळ, पोहणे अशा एकूण 10 स्पर्धा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी समाज कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी दिली. तसेच खेळण्यासाठी आवश्यक साहित्य, गणवेश, पाणी, जेवण आणि आरोग्य सेवेसाठी प्राथमिक उपचार तसेच रुग्णवाहिकेची सोय करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

DIVYANG VIDYARTHI SPARDHA1दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असून यामुळे मुलांचा आत्मविश्वास बळावला जाणार आहे, असे मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले. तर आपल्या व्यंगत्वावर मात करून सर्व क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या सभापती दर्शना दुमाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेले अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर, मतिमंद तसेच बहुविकलांग खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती दामोदर पाटील, सदस्या नीता पाटील, विपुला सावे, स. तु. कदम संस्थेचे अध्यक्ष वागेश कदम, समाज कल्याण विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच जिल्ह्यातील विशेष शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top