दिनांक 11 December 2018 वेळ 2:12 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

आदिवासी विभागातून आंतराष्ट्रीय व ऑलम्पिक खेळाडू तयार झाले पाहिजे -पालकमंत्री विष्णू सवरा 

AADIWASI PRAKALP SPARDHA1प्रतिनिधी/जव्हार, दि. 5 : आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आज, बुधवारी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील 30 शासकीय आश्रम शाळा व 17 अनुदानित, विनाअनुदानित आश्रम अशा एकुण 47 शाळांतील 1 हजार 167 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

जव्हार आदिवासी विकास प्रकल्पात चार तालुक्यांचा समावेश असुन तालुक्यांतील प्रत्येक संघांना नावे देण्यात आली आहेत. जव्हार चॅलेंजर्स, वाडा वॉरिअर्स, मोखाडा फायटर्स, वीर विक्रमगड अशी या संघांची नावं आहेत. या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, फुटबॉल, हॅण्डबॉल, हॉलीबॉल आदी खेळांचा समावेश असुन 17 वर्षाखालील लहान गट व 19 वर्षावरील मोठा गट अशा दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. तसेच वयक्तिक खेळांमध्ये 1 हजार मीटर धावणे, 100 मीटर धावणे, रिले, भाला फेक, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी, आदी खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजयी संघाची राज्य पातळीवरील स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे.

AADIWASI PRAKALP SPARDHA2या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना आदिवासी विभागातून आंतराष्ट्रीय व ऑलम्पिक खेळाडू तयार झाले पाहिजेत, अशी इच्छा पालकमंत्री सवरा यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपिठावर आंतरराष्ट्रीय धावपटू किशन तडवी, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंद्रसिंग, प्रकल्प नियोजन समितीचे अध्यक्ष हरीचंद्र भोये, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, सभापती अर्चना भोरे, विक्रमगड सभापती मधुकर खुताडे, माजी सभापती ज्योती भोये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, पंचायत समिती सदस्या अनुराधा डोके, यशोदा भोरे, तसेच स्पर्धेत सहभागी सर्व आश्रम शाळांचे मुख्याध्यापक, खेळाडू, पंच, कमेटी, विनवळचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top