जिल्ह्यात गोवर रुबेल्ला मोहिमेची अंतरराष्ट्रीय परीवेक्षकाकडून पाहणी

0
6

GOVER RUBELA MOHIM PAHNIRajtantra Media/पालघर, दि. 5 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेल्ला मोहिमेची पाहणी करण्यासाठी अंतरराष्ट्रीय परीवेक्षक डॉ. कॉलीन स्कॉट जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी वाडा तालुक्यातील खुटल जिल्हा परिषद शाळा, सफाळे येथील जे. पी. आंतरराष्ट्रीय शाळा, विक्रमगड तालुक्यातील खाजगी शाळा आणि पालघर येथील ट्विंकल स्टार या शाळांमध्ये पाहणी केली. यावेळी त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, डब्लूएचओचे समन्वयक डॉ. आनंद सोनटक्के आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments