प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरीकांची मागणी असलेल्या तालुक्यातील पाच रस्त्यांचे भूमिपूजन शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) करण्यात आले.
तालुक्यातील वाडा-मनोर राज्यमार्ग ते नवजीवन कर्णबधिर शाळा, हरोसाले गावठाण पाडा रस्ता, वाडा तिळसा रोड ते गाळे गाव रस्ता, सापने बु. ते कांदिवली ते राष्ट्रीय महामार्ग 34 ला जोडणारा रस्ता, वरले- आलमान- सरसओहोल – विलकोस – अंजनीनगर – परळीफाटा रस्ता आदी पाच रस्त्यांचे आज भूमिपूजन करण्यात आले. स्थानिकांची अनेक वर्षांची मागणी लक्षात घेता निलेश गंधे यांनी विशेष प्रयत्न करून विविध योजनांच्या माध्यमातून सदर रस्ते मंजूर करवून घेतले. या रस्त्यांसाठी सुमारे 88 लाख रुपयांचा निधी खर्च होणार असल्याची माहिती गंधे यांनी दिली.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती हावरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता धनंजय जाधव, कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!