दिनांक 11 December 2018 वेळ 12:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु

पालघर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु

PALGHAR NAGARPARISHAD NIVADNUKवार्ताहर/बोईसर, दि. 4 : पालघर नगर परिषदेची मुदत एप्रिल 2019 मध्ये संपत असून त्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडतीबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने याबाबत माहिती दिली. या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असुन नगराध्यक्ष पदासाठी प्रथमच थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे मतदार आता थेट नगराध्यक्ष निवडून देणार असुन या पार्श्‍वभुमीवर सर्व पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहे.

प्रभागांची संख्या, प्रभाग निहाय लोकसंख्या, नगर परिषद क्षेत्र, क्षेत्राचे सीमांकन, नकाशा प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आज मान्यता देऊन येत्या 7 डिसेंबरला सदस्य पदासाठीची आरक्षण सोडत प्रसिद्ध होईल. तर 11 डिसेंबरपर्यंत आरक्षणाची सोडत प्रसिद्ध होईल. तसेच प्रारूप प्रभाग रचना संदर्भात 14 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहेत व त्यावर 27 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पालघर नगर परिषदेची 14 प्रभागातील सदस्य संख्या नगराध्यक्ष मिळून 29 राहणार आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top