दिनांक 11 December 2018 वेळ 1:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कासा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

कासा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी/डहाणू, दि. 29 : पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा कमकुवत करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणार्‍या कासा पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाच स्विकारताना संगेहाथ अटक केली आहे. तुषार शालिग्राम भदाने (वय 32) असे सदर लाचखोर अधिकार्‍याचे नाव असुन पहिला हफ्ता म्हणून 75 हजार रुपयांची रक्कम स्विकारताना भदानेसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे.

कासा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार यांच्या नावे गुन्हा नोंद असून या प्रकरणात मदत करून गुन्हा कमकुवत करण्यासाठी भदाने यांनी तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीनंतर ही रक्कम दोन लाख रुपये ठरविण्यात आली. या रकमेचा पहिला हफ्ता म्हणून 75 हजार रुपये देण्याचे ठरले असता तक्रारदार यांनी 26 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर युनिटकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक एम. ए. वाघमारे यांच्यासह पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुवारे, चव्हाण, सुमडा, पालवे, मांजरेकर व पोलीस शिपाई दोडे यांच्या पथकाने काल, बुधवारी रात्री 1 च्या सुमारास सापळा रचुन पोलीस उप निरीक्षक तुषार भदाने व खाजगी इसम प्रकाश अर्जुन चौधरी (वय 32) या दोघांना 75 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक केली. दरम्यान, 2 वर्षांपुर्वी याच पोलीस अधिकार्‍यावर भ्रष्ट्राचाराप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याचे पालघर लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी अजय आफळे यांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top