दिनांक 26 May 2020 वेळ 7:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा-मनोर मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

वाडा-मनोर मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

WADA ACCIDENTदिनेश यादव/वाडा, दि. 28 : वाडा-मनोर महामार्गावरील वरले गावाजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर वाड्यातील शर्वरी रुग्णालयात उपचार सुरु असुन सुप्रीम कंपनीच्या अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे.

विक्रमगड तालुक्यातील आपटी येथील दिनेश हडळ (वय 22) आणि रोहित पाटील (वय 19) हे दोन तरुण दुचाकीवरुन सकाळी साडेआठच्या दरम्यान वाडा-मनोर महामार्गावरुन वाड्याच्या दिशेने निघाले असताना वरले येथे निमुळत्या होत गेलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणार्‍या एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दिनेश हडळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर रोहित पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वाडा येथील शर्वरी या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याचा ठेका घेतलेल्या सुप्रीमच्या अपुर्ण कामामुळेच हा अपघात झाला झाल्याचा आरोप येथील नागरीकांनी केला आहे. सुप्रीमच्या अपुर्ण कामामुळे आजपर्यंत अनेक वाहनचालकांना आणि नागरिकांना आपला नाहक जिव गमावावा लागला आहे. रस्त्याच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामामुळे झालेल्या अपघातानंतर देखील अपुर्ण असलेले रस्ते पूर्ण करण्यास सुप्रीम कंपनीला काहीही सारस्य नसल्याचे दिसत असल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.

वरले येथील निमूळता होत गेलेला
रस्ता अत्यंत धोकादायक
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ते अपुर्ण अवस्थेत आहेत. त्यात वरले येथे निमूळता होत गेलेल्या व अपुर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्यावर वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे याआधी देखील अनेक अपघात घडले असून जीवितहानी झालेली आहे. मात्र याकडे सुप्रीम कंपनीसह प्रशासनाने आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्याचा ठेका असलेल्या सुप्रीम कंपनीच्या अपुर्ण कामामुळेच या तरुणाला आपला जिव गमावावा लागला आहे. त्यामुळे सुप्रीम कंपनीने मृत तरुणाच्या कुंटूंबियांना त्वरीत आर्थिक मदत करावी.
-प्रमोद पाटील
सामाजिक कार्यकर्ते, आपटी

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top