दिनांक 21 September 2019 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » समुद्र क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना

समुद्र क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : मासेमारीच्या नियमांचे उल्लंघन करून दमण ते दातीवरे समुद्र क्षेत्रात बेकायदा मासेमारी करणार्‍या ठाणे, वसई, अर्नाळा व गुजरात राज्यातील जाफराबाद येथील मच्छीमारांना रोखण्यासाठी दमण ते दातीवरे दरम्यानच्या सर्व मच्छीमार संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली आहे.

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

गेल्या महिन्यात पालघरमधील वडराई समुद्र किनार्‍यापासून 12 नॉटिकल अंतरावर मुंबईमधील ट्रॉलर पकडण्यात आले होते. या ट्रॉलरमध्ये लाखो रुपयांचे मासे आढळले होते. या घुसखोरीच्या प्रकारानंतर गेले अनेक वर्षे खदखदत असलेला हा प्रश्‍न अधिक उफाळून आला आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी संबंधित विभागांकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने अखेर अशा मच्छीमारांना रोखण्यासाठी दातीवरे ते दमण दरम्यानच्या विविध मच्छीमार संघटनांनी एकत्र येत सर्वानुमते समन्वय समितीची स्थापना केली आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीस दमण ते दातीवरे किनारपट्टीवरील मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी व मच्छी विक्रेते हजर होते. डहाणूचे अशोक भिवा आंभिरे यांची अध्यक्ष म्हणून तर दांडीचे राजेंद्र पागधरे व हरेश्वर मेहेर, दमणचे हितेशभाई, सातपाटीचे सुभाष तामोरे या चौघांची समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत बाहेरील मच्छीमारांना 20 नॉटिकल हद्दीत येऊन द्यायचे नाही, असा ठराव घेण्यात आला. यावेळी जाफराबाद येथील मनीष तांडेल यांची शिवकृपा बोट दांडी समुद्रात 16 नॉटिकल अंतरावर घुसखोरी करून मासेमारी करत असल्याचे राजेंद्र पागधरे यांनी सांगितले. तसेच यापुढे अशा बोटींवर कारवाई व्हावी व घुसखोर बोटींना रोखण्यासाठी सर्वांनी संघटित राहण्याची गरज असल्याचे पागधरे म्हणाले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top