दिनांक 21 February 2020 वेळ 12:51 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

पहिल्या दिवशी 25 हजार मुलांचे लसीकरण

GOVER RUBELA1Rajtantra Media/पालघर, दि. 27 : शासनातर्फे जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील तब्बल 8 लाख बालकांना गोवर व रुबेला लस देण्यात येणार असून या मोहिमेचा आज सर्व तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी जवळपास 25 हजार मुला-मुलींना ही लस देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या हस्ते वाड्यातील पी. जे. हायस्कुल येथून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे तालुकास्तरीय उद्घाटन झाले. यावेळी वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, नगरसेविका जागृती काळण, सामाजिक कार्यकर्ते भरत थोरात, संजय पातकर, आरोग्य अधिकारी डॉ. संजय बोरपूल्ले पी. जे. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील, शिक्षक एम. एस. डेंगाणे, बी. के. पाटील व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालय येथे उपस्थित राहून त्यांच्या दोन्ही मुलांना लसीकरण करुन मोहिमेची सुरवात केली. यावेळी जव्हारचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बिरारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील, डॉ. शिंदे, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. पी. पाटील तसेच नगरसेवक देवीदास काकड, विभागप्रमुख प्रमोद दिंगोरे, उप शहर प्रमुख अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी पालघर तालुक्यातील भगिनी समाज शाळेत उपस्थित राहून सदर मोहिमेचे तालुकास्तरीय उद्घाटन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे, शिक्षणाधिकारी (प्रा) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (मा) मोहन देसले, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे, मुंबईच्या कुपर रुग्णालय आणि वैद्यकीय महविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अडसूळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, पालघर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी आदि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ. खंदारे यांनी तालुक्यातील नागझरी येथील शाळेत जाऊन स्वतः मुलांना लस दिली व मोहिमेची पाहणी केली.

या कार्यक्रमादरम्यान लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच मोहिमेचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जगजागृती करण्यात आली.

ही मोहिम पुढील 4 ते 6 आठवडे सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील तालुक्यातील सर्व खासगी, शासकीय शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच गावे, पुनर्वसित वसाहती, वीट भट्ट्यांच्या जागा व आदिवासी भागांमध्ये फिरत्या वाहनातून लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिनिधी/जव्हार, दि. 27 : तालुक्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले यांच्या हस्ते के. व्ही. हायस्कुल येथे करण्यात आले. ही लस बालकांसाठी अत्यंत सुरक्षित असुन या लसीकरणामुळे तुमचे बाळ आजारांपासून अधिक सुरक्षित होईल, असे आरोग्य अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच के. व्ही. हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.

प्रतिनिधी/जव्हार, दि. 27 : तालुक्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल व जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले यांच्या हस्ते के. व्ही. हायस्कुल येथे करण्यात आले. ही लस बालकांसाठी अत्यंत सुरक्षित असुन या लसीकरणामुळे तुमचे बाळ आजारांपासून अधिक सुरक्षित होईल, असे आरोग्य अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुक्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच के. व्ही. हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top