दिनांक 16 June 2019 वेळ 5:07 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : क्षुल्लक कारणावरून मुलांनीच केली वडिलांची हत्या

वाडा : क्षुल्लक कारणावरून मुलांनीच केली वडिलांची हत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 26 : तालुक्यातील बागलांची खरीवली या गावात क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलांनीच वडिलांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. काळूराम गणू जाधव असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असुन याप्रकरणी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास काळूराम जाधव (वय 52) यांचे आपली मुले दीपक जाधव (वय 29) व निलेश जाधव (वय 24) यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला. पुढे या वादाचे पर्यवसान पुढे हाणामारीत होऊन दोन्ही मुलांनी काळूराम जाधव यांना लोखंडी सळ्यांनी जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना तत्काळ अटक केली. तसेच दोघांविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302, 24 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे अधिक तपास करीत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top