दिनांक 03 July 2020 वेळ 3:07 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » भात पावलीची धोकादायक वाहतूक

भात पावलीची धोकादायक वाहतूक

पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताला निमंत्रण!

BHAT PAVLI VAHTUKवार्ताहर/बोईसर, दि. 26 : बोईसर-चिल्हार रस्ता तसेच पुढे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सर्रासपणे भात पावलीची धोकादायक वाहतूक सुरु असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत वाहनचालकांकडुन संताप व्यक्त होत आहे.

तारापूर औद्योगिक परिसर व तारापूर अणुशक्ती ऊर्जा केंद्रामुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या पुर्वेकडील बोईसर-चिल्हार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच भागात लहान-मोठे शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करत असल्याने शेतातून निघालेल्या पावलीची विक्री केली जाते. सध्या गवत, पावली खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला असल्यामुळे बोईसरसह पुर्व भागात अनेक एलपी ट्रकमधुन या पावलीची वाहतूक केली जात आहे. मात्र ही वाहतूक करताना वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले जात नसुन ट्रकचालकांकडून धोकादायकरित्या ट्रक हाकले जात आहेत. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक तसेच 10 ते 12 फुट उंचीपर्यंत पावली भरली जात असल्याने ट्रक कधीही उलटण्याची शक्यता असते. तर ट्रकवर ताळपत्रीचा वापर केला जात नसल्याने हवेत उडणारे गवत मागे चालणार्‍या वाहनचालकांसाठी अडथळा ठरुन अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. असे असताना स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग जाणीवपुर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीक करत असुन अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top