दिनांक 26 May 2020 वेळ 8:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करा, शेतकर्‍यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा!

जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करा, शेतकर्‍यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा!

JAWHAR MORCHAप्रतिनिधी/जव्हार, दि. 26 : जव्हार तालुक्याला दुष्काळ यादीतुन वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून जव्हार तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवारी जव्हार शहर कडकडीत बंद करून नुकसान झालेले भात पिकं घेऊन शेतकर्‍यांनी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जिल्ह्यात परतीच्या पावसाने दडी मारल्याने अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती ओढवली आहे. यात जव्हार तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले असताना तालुक्याला मात्र दुष्काळ यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे याविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. दुष्काळासह रोजगार, रस्ते, आरोग्य, वनपट्टे, विजेच्या समस्या आदी विषयांना घेऊन मोर्चेकरी आक्रमक झाले होते.

जव्हार एसटी बस स्थानकापासुन निघालेल्या या मोर्चात शेतकर्‍यांसह महिलावर्ग व माकपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. परतीच्या पावसाअभावी भात, नागलीची पिके करपून गेली आहेत. या करपून गेलेल्या पिकांच्या गुंड्या हातात घेऊनच शेतकर्‍यांनी प्रांत कार्यालायावर धडक दिली. यावेळी प्रांत अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने अधिकच आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी जोरदार घोषणा बाजी करीत इतर अधिकार्‍यांना वेठीस धरल होते. अखेर पाच दिवसात मागण्यांबाबत निर्णय घेऊन शेतकर्‍यांना न्याय देऊ, असे आश्‍वासन तहसीलदारांनी व अन्य अधिकार्‍यांनी दिल्यानंतर हा मार्चा मागे घेण्यात आला. दरम्यान, माकपचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांनी मोर्चेकर्‍यांना यावेळी मार्गदर्शन केले. पंचायत समिती सदस्य यशवंत घाटाळ व लक्ष्मण जाधव, कॉ. शिवराम बुधर, कॉ. यशवंत बुधर, कॉ. शांतीबाई खुरकुटे, विजय शिंदे, सुरेश बुधर, सुधीर बुधर, शांताराम माळी, बाबू ढिगारे आदी मोर्चात सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top