दिनांक 26 May 2020 वेळ 9:34 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » आय.टी.आय. निदेशक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन

आय.टी.आय. निदेशक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन

LOGO-4-Onlineडहाणू, दि. 25 : शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजक विभागातील विविध समस्यांविरोधात आय.टी.आय. निदेशक संघटनेने येत्या मंगळवारी (दि. 27) मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन पुकारले आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता खात्यातील गंभीर समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाची झालेली दुरावस्था पाहून कौशल्य विकास राज्यामध्ये केवळ कागदोपत्रीच राहिला आहे कि काय? अशी भावना प्रशिक्षण देणार्‍या निदेशकांच्या मनामध्ये बळावली आहे. यासंदर्भात वेळोवेळी संघटनेने निवेदने, आंदोलनाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु शासन व प्रशासन स्तरावरून या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रशिक्षण व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून केला आहे.

राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौशल्य विकासाचे महत्व विचारात घेता सुमारे 4 वर्षांपूर्वी कौशल्य विकास व उद्योजकता खात्याची स्वतंत्र निर्मिती करण्यात आली. या खात्यांतर्गत रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती तसेच उद्योग जगताला अत्याश्यक असणार्‍या चार स्तंभापैकी एक स्तंभ म्हणजे कुशल कारागिर निर्माण करण्याची योजना आय.टी.आय. राबविते. येथे प्रशिक्षण देणारे निदेशक त्याचे सारथी आहेत. शिक्षकाला पर्याय नाही, हे शिक्षण व्यवस्थेचे वास्तव असताना आज खात्यात 50 टक्के शिक्षकीय पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकेका शिक्षकाकडे 4-4 तुकड्यांचा अतिरिक्त कार्यभार आहे. प्रात्यक्षिकासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा निधी 4 महिने देखील पुरत नाही. त्यामुळे हा निधी वाढविण्याची नितांत गरज आहे. जुनाट यंत्र व हत्यारे निर्लेखित करून अद्ययावत

पाठ्यक्रमानुसार नवीन यंत्रसामुग्री व हत्यारे उपलब्ध व्हावीत, कालबाह्य सेवाप्रवेश नियम बदलावेत तसेच सर्वांना पदोन्नतीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा, आदींसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंद्र आहे. मात्र त्याचीच येथे मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु आहे. प्रशिक्षणार्थी व निदेशक हि कौशल्य विकासाची दोन चाके आहेत. पण आज ही दोनही चाके जमिनीत रूजून बसली आहेत. त्यांना बाहेर काढून कौशल्य विकासाचा रथ डौलाने पळवायचा असेल तर प्रशिक्षणाला अत्यावश्यक असणार्‍या मुलभूत गरजा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. आज कडेकोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या या खात्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठीच आमचा हा अट्टाहास शासन-प्रशासनापर्यंत पोहचावा व सकारात्मक निर्णय हावा, असा उद्देश आंदोलनामागे असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top