दिनांक 26 May 2020 वेळ 7:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, 4 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

बोईसरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, 4 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास

BOISAR CHORIवार्ताहर

बोईसर, दि. 25 : येथील अमेय पार्क भागात घरी कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी चार लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रविवारी दिवसाढवळ्या ही घरफोडीची घटना घडली. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेय पार्कमधील संस्कृती या इमारतीत दिनेश संखे यांचा फ्लॅट आहे. दिनेश संखे आपल्या विक्रमगडमधील उपराळे गावी त्यांच्या कुटुंबासह गेले होते. संखे यांच्या घरी घरकाम करणारी महिला दुपारी शेजारच्यांकडून फ्लॅटची चावी घेऊन काम करण्यास आली असता तिला फ्लॅटच्या सेफ्टी व मुख्य दरवाजाचे लॉक व कड्या तोडलेल्या अवस्थेत व दोन्ही दरवाजे उघडे दिसले. याबाबत शेजार्‍यांकडून माहिती मिळताच दिनेश संखे व त्यांची पत्नी निशा घरी परतले असता त्यांना घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले. यानंतर त्यांनी तत्काळ बोईसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असुन चोरट्यांनी बेडरुमचे कपाट फोडून त्यात ठेवलेले 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने, ब्रिटीशकालीन नाणी व 78 हजारांची रोख रक्कम, असा एकूण 4 लाख 35 हजारांचा एवज लंपास केला आहे.

याप्रकरणी बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top