दिनांक 03 July 2020 वेळ 2:53 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शेतकरी हाच सरकारच्या केंद्रस्थानी! -विश्वास पाठक

शेतकरी हाच सरकारच्या केंद्रस्थानी! -विश्वास पाठक

MSEBवार्ताहर/बोईसर, दि. 25 : समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जाणारा शेतकरी हाच सरकारच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या देखरेखीखाली महावितरणने शेतकरी हिताच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी तसेच उच्चदाब वीज वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) सारख्या महत्वाकांक्षी योजना महावितरण राबवत आहे, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) या सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.

पाठक यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता किरण नायगावकर व प्रवीण परदेशी उपस्थित होते.

पाठक पुढे म्हणाले, उच्चदाब वीज वितरण प्रणाली व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवण्यात मोलाच्या ठरणार आहेत. गेल्या चार वर्षांत साडेचार लाख शेतकर्‍यांना विजजोडणी देण्यात आली असून जवळपास 2 लाख 25 हजार शेतकर्‍यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून विजजोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सरकारने 5 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यासोबतच शेतकर्‍यांचे विजविषयक बहुतांश समस्यांचे निराकरण होणार आहे. सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. अटल सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा पुरवण्यात येत आहे. एकूणच शेतकरी हा घटक केंद्रस्थानी ठेवून सरकारने हाती घेतलेल्या योजनांमुळे शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत मिळणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

विजेशी संबंधित निर्मिती, पारेषण आणि वितरण या तिन्ही यंत्रणांचे गेल्या चार वर्षांत सक्षमीकरण केल्याने राज्याची 24 हजार 900 मेगावॅटची विक्रमी मागणी कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करता आली. वाडी-पाड्यांचे विद्युतीकरण, सौभाग्य या योजनांमधून विद्युतीकरणापासून वंचित घटकांपर्यंत प्रकाश पोहचवण्याचे मोठे काम शेवटच्या टप्प्यात आहे, अशी माहिती यांनी दिली.

तसेच पालघर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा अद्यावत करण्यासाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाने 24 कोटींचा निधी दिला आहे, अशी माहिती कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे यांनी दिली. या निधीतून उपकेंद्र उभारणी, उपकेंद्रांची क्षमता वाढवणे, रोहित्रांची उभारणी, रोहित्रांची क्षमता वाढवणे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे जाळे अद्यावत करणे, अशी कामे करण्यात येणार आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा महावितरण देऊ शकणार असल्याचे जलतारे यांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top