दिनांक 22 August 2019 वेळ 2:51 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावितरणच्या अधिकार्‍याचा हलगर्जीपणा, विजेच्या धक्काने कर्मचारी ठार

महावितरणच्या अधिकार्‍याचा हलगर्जीपणा, विजेच्या धक्काने कर्मचारी ठार

WADA SHOCKप्रतिनिधी/वाडा, दि. 18 : महावितरणच्या वाडा ग्रामीण कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्याने आपल्या कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे वाडा ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या वैभव पंगारा (वय 25) या कंत्राटी कर्मचार्‍याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी (दि.16) संध्याकाळी घडली.

शुक्रवारी अबिटघर येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वाडा ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंता ब्रह्मानंद चौधरी ग्रामीण भागात कंत्राटी काम करणार्‍या तीन कामगारांना घेऊन सदर ठिकाणी दाखल झाले. यानंतर अबिटघर येथील विज उपकेंद्रात (स्विचींग हाऊस) बिघाड असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र यावेळी उच्च दाबाने (22 के.व्ही.) प्रवाहित असलेला विद्युत प्रवाह बंद न करताच चौधरी यांनी कर्मचार्‍यांकडून काम करवून घेण्यास सुरुवात केल्याने उच्च दाबाच्या विद्युत तारांच्या संपर्कात येऊन वैभव पंगारा यास विजेचा जोरदार धक्का बसला व तो जागीच ठार झाला. तर प्रवीण तरसे (24) हा कर्मचारी जखमी झाला. कनिष्ठ अभियंता चौधरी यांच्या देखरेखीत काम सुरु असताना ही घटना घडल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता कामात हलगर्जीपणा केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

तसेच या बेजबाबदार अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मृत्यू पावलेल्या पंगारा याच्या कुटूंबियांनी केली आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी वाडा पोलीस ठाण्यात सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.

महावितरण कंपनीच्या वाडा कार्यालयाचे उप अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता मी रजेवर असल्यामुळे या घटनेविषयी माझ्याकडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

या अपघातात मी देखील जखमी झालो असून माझा सहकारी वैभव पंगारा यास प्राणाला मुकावे लागले असल्याने त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे.
– प्रवीण तरसे,
कंत्राटी कामगार

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top